Parbhani Story Of Jyoti Gavate | ढाका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत परभणीची ज्योती गवते द्वितीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani Story Of Jyoti Gavate

ढाका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत परभणीची ज्योती गवते द्वितीय

परभणी : बांगलादेशाची राजधानी ढाका येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन (International Marathon) स्पर्धेत मुंबईची आरती दत्तात्रय पाटील (Aarti Dattatraya Patil) हिने प्रथम तर परभणीची ज्योती गवते हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

बंगाबंधू आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत या दोघींनी मंगळवारी रात्री हे यश पटकावले. परभणीची गवते ही मराठवाडा एक्सप्रेस म्हणून सर्वदूर सुपरिचित आहे. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत तिने तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावला. (Parbhani Story Of Jyoti Gavate)

हेही वाचा: सप्तश्रृंगगडावर गुलाबी थंडी अन दाट धुके;पाहा व्हिडिओ

अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेत ज्योती गवते हिने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. ढाका येथील मॅरेथॉन स्पर्धेत तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिच्यावर परभणीच्या क्रिडाक्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मॅरेथॉन स्पर्धेत आफ्रिकी देशांचा दबदबा असताना भारतातून विशेष करुन महाराष्ट्रातून येणारी एक मॅरेथॉनपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top