Dharashiv Minor Girl Case
esakal
भूम (धाराशिव) : शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या अपंग अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस (Bhoom Dharashiv Case) आली आहे. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ ऑक्टोबरच्या रात्री कुटुंब जेवणानंतर झोपले असताना आरोपींनी त्यांच्या दाराला कडी लावून घरावर दगडफेक केली.