
धाराशिव : खरीप हंगामात जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ३०८ कोटी २१ लाख रुपये अनुदान प्रस्तावास मंजुरी देऊन शेतकऱ्यांना तातडीने त्याचे वितरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे केली आहे.