कर्तव्यावर प्राण अर्पण केलेल्या वीर जवानांना पोलिसांकडून श्रद्धांजली

कर्तव्यावर प्राण अर्पण केलेल्या  वीर जवानांना पोलिसांकडून श्रद्धांजली
Published on: 
एसपी कार्यालयामध्ये पोलिस स्मृतिदिन कार्यक्रम धाराशिव, ता. २१ ः लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे कर्तव्य बजावताना वैयक्तिक सुरक्षिततेची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या जवानांच्या स्मृतीस धाराशिव पोलिस मुख्यालय येथे बुधवारी (ता. २१) आदरांजली वाहण्यात आली. धाराशिव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलिस मुख्यालयात पोलिस स्मृतिदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या हुतात्मा जवानांच्या असीम त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक रितू खोखर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, प्रभारी पोलिस उप अधीक्षक (गृह) आमोद भुजबळ आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक नमिता देशमुख यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पोलिस अधीक्ष खोखर म्हणाल्या, की २१ ऑक्टोबर १९५९ ला लडाखमधील १८ हजार फूट उंचीवरील हॉटस्प्रिंग येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या दहा जवानांनी चिनी सैनिकांच्या अचानक झालेल्या हल्ल्याला अपुऱ्या शस्त्रांनिशी धैर्याने प्रतिकार करत वीरमरण पत्करले होते. त्यांच्या या शौर्याची गाथा देशभरात स्मरणात ठेवण्यासाठी हा दिवस पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. तसेच, गेल्या वर्षभरात देशभरात कर्तव्य बजावताना १५४ पोलिस अधिकारी व अंमलदारांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले आहेत, त्यांच्या या बलिदानाचे पोलिस दल सदैव ऋणी राहील. पोलिस हवालदार अविनाश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पोलिस मुख्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विविध शाखांचे प्रमुख आणि पोलिस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ....... धाराशिव ः येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील मुख्यालयात बुधवारी आयोजित पोलिस स्मृतिदिन कार्यक्रमात शहीद जवानांना मानवंदना देताना पोलिस अधीक्षक रितू खोखर व इतर. ... फोटो क्रमांक ःOSM26B07254

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com