धारुर बाजार समितीचे सभापती बडेंचे कोरोनाने निधन, पंकजा मुंडेंनी केली भावनिक पोस्ट

महादेव बडे
महादेव बडे
Updated on
Summary

धडाडीचे नेते महादेव बडे यांच्या निधनाने एक जीवाभावाचा कार्यकर्ता आपण गमावला आहे.

बीड : धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Dharur Agriculture Producing Committee) सभापती महादेव बडे (Mahadev Bade) (वय ६२) यांचे रविवारी (ता.२३) कोरोनाने निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. बडे हे दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंचे (Pankaja Munde) विश्वासू म्हणून ओळखले जात होते. आपला हा विश्वासू अवेळी गेल्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून पंकजा मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महादेव बडे
कब्रस्तान अन् शेतजमिनीचा वाद मिटला, पोलिसांनी घेतला पुढाकार

पंकजा म्हणतात, की धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि डोंगरपट्टयातील धडाडीचे नेते महादेव बडे यांच्या निधनाने एक जीवाभावाचा कार्यकर्ता आपण गमावला आहे.महादेव बडे यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. ते खूप कमी बोलायचे. धारूर व परिसरातील तालुक्यात त्यांचा चांगला लोकसंग्रह होता. प्रत्येकांच्या अडीअडचणीला ते धावून जात. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती अशा विविध पदांवर काम करतांना सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. वडवणी, धारूर भागातील लोकांचे प्रश्न घेऊन ते नेहमी माझ्याकडे येत असत. त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही. 'बोला मुकदम', असं मी त्यांना नेहमी म्हणायचे. कोरोना आजाराने त्यांचे जाणे हे अत्यंत वेदनादायी व दुःखद आहे. जीवाभावाचा कार्यकर्ता गमावला आहे, या शब्दात पंकजा मुंडेंनी श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Yellow date farming success story in Marathwada earning Rs 3 lakh per acre
Who can apply for BAMU direct admission 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com