औरंगाबाद : यिन च्या जिल्हाध्यक्षपदी धायगुडे, शहराध्यक्षपदी मुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : यिन च्या जिल्हाध्यक्षपदी धायगुडे, शहराध्यक्षपदी मुळे
औरंगाबाद : यिन च्या जिल्हाध्यक्षपदी धायगुडे, शहराध्यक्षपदी मुळे

औरंगाबाद : यिन च्या जिल्हाध्यक्षपदी धायगुडे, शहराध्यक्षपदी मुळे

‘सकाळ माध्यम समूहा’च्या(sakal media group) ‘यिन’ अर्थात ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’(yin)च्या निवडणुकीत माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातील विद्यार्थी अविनाश धायगुडे याची जिल्हाध्यक्षपदी तर यशोदीप फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी मुळे हिची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.जिल्ह्यातील ६७ महाविद्यालयांतून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची ऑनलाइन निवड झाली. यात निवडून आलेल्या अध्यक्षांमधून जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची निवड करण्यात आली. (Dhaygude as Yin's district president,mule as city president in aurangabad)

हेही वाचा: अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची धमक : रावसाहेब दानवे; पाहा व्हिडिओ

ही निवड प्रक्रिया शनिवारी (ता.१) ‘सकाळ’ विभागीय कार्यालयात पार पडली. सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत ६० गुणांची लेखी परीक्षा, त्यानंतर ४० गुणांची तोंडी परीक्षा झाली. त्यातून प्रथम चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या चार विद्यार्थ्यांनी परीक्षकांसमोर आपल्या भाषण कौशल्यातून मते मांडले. यावेळी या विद्यार्थ्यांनी दिलेली लेखी, तोंडी व वक्तृत्व परीक्षांचा निकाल परीक्षकांनी जाहीर केला. यात अविनाश धायगुडेला १०० पैकी ८४ गुण तर वैष्णवी मुळेला १०० पैकी ७४ गुण मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. श्रीहरी पांडव आणि प्रा. साईनाथ वडजे यांनी काम पाहिले. दरम्यान, धायगुडे व मुळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव

केला.

माझ्यासारख्या ग्रामीण भागातील युवकाला ‘सकाळ समूहा’ने समाजापुढे येण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी काम करेल.

-अविनाश धायगुडे, जिल्हाध्यक्ष

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या माध्यमातून मला जी नेतृत्व करायची संधी मिळाली आहे, त्याचे मी शंभर टक्के सोने करीन आणि माझे सर्व कामाचे उत्तरदायित्व पूर्ण क्षमतेने पार पाडले.

-वैष्णवी मुळे, शहराध्यक्ष

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top