esakal | ढोरकीन: टेम्पोच्या धडकेत रिक्षा चालक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

ढोरकीन: टेम्पोच्या धडकेत रिक्षा चालक ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढोरकीन: औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील लोहगाव फाट्याजवळ रविवारी (ता.५) भरधाव आयशरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अॅपेरिक्षा चालक जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ११ वाजता घडली. सलीम अजीज बेग (वय ५५, रा. कौडगाव ता.पैठण) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा: सौताडा धबधबा ओसंडून कोसळू लागला; पाहा व्हिडिओ

याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी ११ वाजेदरम्यान बेग हे अॅपेरिक्षा (क्र. एम.एच-२०-टि-४२९४) घेऊन कौडगावहुन ढोरकीनकडे प्रवासी भाडे घेऊन जात असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्‍या आयशर टेम्पाने (क्र. एम.एच-१६ क्यु-५७०६) रिक्षाला जोरदार धडक दिली. यात बेग यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर टेम्पो चालकाने पळून जाण्याच्या प्रयत्न केला असता, स्थानिक ग्रामस्थांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. माहिती मिळताच पैठण एमआयडीसी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक चौरे, पोलिस उप निरीक्षक राहुल भदर्गे, बिट जमादार दिनेश दाभाडे, तुकाराम मारकळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पैठण एमआयडीसी ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

loading image
go to top