

Mohan Bhagwat Predicts End of Caste Divide in a Decade
sakal
छत्रपती संभाजीनगर: ‘पूर्वी व्यवसाय आणि कामानुसार जात व्यवस्था तयार झाली. पुढे ती समाजाला चिकटल्याने जातिभेद सुरू झाला. जातिभेद संपविण्यासाठी जात न पाहण्याची मनाला सवय करावी लागेल. हे सर्वांनी प्रामाणिकपणे केले, तर दहा-बारा वर्षांत जातिभेद संपुष्टात येईल’, असा दावा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला.