Chhatrapati Sambhajinagar: दिडगावमध्ये दुहेरी शोकांतिका; नातवाच्या स्वतःचा जीव घेतल्याचा चा धक्का सहन न झाल्याने आजीचाही मृत्यू

Double Tragedy Reported from Didgaon in Sillod: सिल्लोड तालुक्यातील दिडगाव येथे बारावीत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यात १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सुनिल पांढरे

पळशी: दिडगाव, ( ता. सिल्लोड ) येथे बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील टॉयलेटमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच धक्का सहन न झाल्याने त्याच्या ७५ वर्षीय आजीचाही मृत्यू झाला. शनिवारी (ता. ४) घडलेल्या या दुहेरी शोकांतिकेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com