
हरेंद्र केंदाळे
छत्रपती संभाजीनगर : केंद्र व राज्य शासनाकडून बँकेचे व्यवहार अधिकाधिक डिजिटल होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात सायबर सुरक्षा आणि होणारी फसवणूक टाळण्यासाठी सजग राहण्याची सूचना वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे डिजिटल सेवा वाढीस लागत असून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत राज्यात २५१ लाख करोड रुपयांचे १,७६७ कोटी व्यवहार ऑनलाइन झाल्याचे समोर आले.