कामाचा दर्जा, गुणवत्तेशी तडजोड नको

कामाचा दर्जा, गुणवत्तेशी तडजोड नको
Published on: 
ABD26J83357 साळवा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाची पाहणी करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता. शाळा बांधकामाच्या दर्जाशी तडजोड खपवून घेणार नाही - साळवा येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी हिंगोली, ता. १८ (बातमीदार) ः कळमनुरी तालुक्यातील साळवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी (ता. १७) भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निधीतून सुरू असलेल्या नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाची तसेच शाळा परिसरातील पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. बांधकामाचा दर्जा व गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता हे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला व कंत्राटदाराला दिले. भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य, तांत्रिक बाबी आणि कामाच्या प्रगतीची सखोल तपासणी केली. शासकीय निधीतून होणारी विकासकामे अत्यंत दर्जेदार व टिकाऊ असावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पोषक शैक्षणिक वातावरण उपलब्ध होईल, यावर त्यांनी भर दिला. तसेच उपस्थित स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाची सद्यःस्थिती जाणून घेतली. यासोबतच शाळेतील इतर आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेत आवश्यक त्या सुधारणा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.