Cattle Smugglers : तब्बल ३०० गोवंश तस्करांवर कारवाई; ७९८ जनावरांची सुटका, ग्रामीण पोलिसांची नऊ महिन्यांतील मोहीम

Rural Police crackdown : ग्रामीण पोलिसांची गोवंश तस्करीवर ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम; १५० गुन्हे नोंद, ३०० आरोपींवर कारवाई, ७९८ जनावरांची सुटका व कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
crime

crime

sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर, : गोवंशाची बेकायदा वाहतूक, अवैध कत्तल, गोमांस तस्करी आणि प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात ग्रामीण पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम राबविली. यात जानेवारीपासून ते ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १५० गुन्हे दाखल करून ३०० आरोपींवर कारवाई केली. ७९८ गोवंश जनावरांची सुटका केली. तसेच २४ हजार २६४ किलो गोमांस आणि ११४ वाहनेही जप्त केली. एकूण ५ कोटी ५९ लाख २२ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com