Diwali Shopping : दिवाळी खरेदीचा ऑनलाइन ट्रेंड

ऑनलाइन खरेदी करूनच आई-वडिलांना दिवाळीचे साहित्य आणि मित्र परिवाराला मिठाई व भेट वस्तू पाठविणार
diwali shopping online trend chhatrapati sambhaji nagar marathi news
diwali shopping online trend chhatrapati sambhaji nagar marathi newsesakal

छत्रपती संभाजीनगर : ‘‘गेल्या चार वर्षांपासून नोकरीनिमित्त परगावामध्ये राहत आहे. केवळ सण-उत्सवातच घरी यायला मिळते. यंदा दिवाळीची सुटी नसल्यामुळे घरी जाऊन कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करता येणार नाही.

त्यामुळे ऑनलाइन खरेदी करूनच आई-वडिलांना दिवाळीचे साहित्य आणि मित्र परिवाराला मिठाई व भेट वस्तू पाठविणार आहे. ऑनलाइन खरेदीमुळे मला ऑफिसमध्ये बसून सगळं काही सहजपणे करता येत आहे,’’ असे अमोल पवार हा तरुण सांगत होता.

दिजीतसारखे अनेक तरुण आहेत, जे नोकरीनिमित्त कुटुंबापासून दूर विविध शहरांमध्ये राहतात. अशावेळी त्यांची कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्यासाठी सण-उत्सवानिमित्त ठरतात. त्याहून जास्त आनंद असतो तो एकत्रितपणे खरेदी करण्याचा.

मात्र, प्रत्येक सणाला सुटी मिळेलच याची शाश्र्वती नसते. त्यात अनेकदा दैनंदिन कामांमुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करणेही शक्य नसते. अशावेळी ऑनलाइन खरेदीचा पर्याय ते निवडतात. यामुळे त्यांना एकाच ठिकाणी विविध गोष्टी खरेदी करता येतात. ऑनलाइन खरेदीचा हा कल सर्वाधिक तरुणांमध्ये दिसून येतो. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होत असल्याचे ते सांगतात.

देशात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजेच दिवाळी. विद्युत रोषणाई, गोडधोड पदार्थ, फराळ, नवे कपडे, नवीन वस्तूंची खरेदी, मित्र परिवाराला भेटवस्तू देत दिवाळीच्या शुभेच्छा देणे, हे दिवाळीचे वैशिष्ट्य. दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये वेगळेच चित्र दिसून येते.

दागदागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी जमू लागते. खरेदीचा आनंद वेगळाच असतो यात काही शंका नाही, परंतु अनेकदा थेट बाजारपेठांमध्ये जाऊन खरेदी करणे अनेकांना शक्य नसते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीचा पर्याय निवडला जातो. त्यात दिवाळीनिमित्त सुरू असलेल्या विविध ऑफर्स आणि सवलतींमुळे ऑनलाइन खरेदीचा कल चांगलाच वाढला आहे.

ऑनलाइन सेल

बाजारातील गर्दी अन् वेळेची बचत म्हणून घर बसल्या खरेदीचा आनंद अनेकजण घेत आहेत. त्यात ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, मिंत्रासारख्या विविध ऑनलाइन व्यासपीठांवर कपडे, सौंदर्य प्रसाधने, गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींवर आकर्षक सवलती दिल्या आहेत.

१०-१५ टक्क्यांपासून ते ७० टक्क्यांपर्यंतची सूट खरेदीवर ठेवली आहे. इतकेच नाही तर दिवाळीनिमित्त खास ऑनलाइन सेल सुरू असल्याने अनेकांना अत्यंत परवडणाऱ्या किमतीत वस्तू उपलब्ध होत आहेत. त्यामुळे असा लाभ बाजारपेठांमध्येही कदाचित मिळणार नाही, असे आयटी क्षेत्रात काम करणारी सुषमा मोरे सांगते.

महिलांसाठी सर्व काही

चकली, चिवडा, लाडू अशा विविध पदार्थांसाठी लागणारे साहित्य असो किंवा कपडे, सौंदर्य प्रसाधने, दागिने आदी सर्व वस्तू ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे याला महिलांकडून पसंती मिळत आहे.

या वस्तूंना पसंती

कपडे, मोबाईल, टीव्ही, ज्वेलरी, निरनिराळ्या प्रकारातील दिवे, खाद्यपदार्थांच्या सामग्री, घरातील सजावटीच्या वस्तू आदी.

याबाबत विशेष खबरदारी घ्या

  • ऑनलाइन शॉपिंग करताना ते विश्‍वसनीय संकेतस्थळावरूनच करा

  • विकत घेतलेली वस्तू परत करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे का, हे पाहा

  • ऑनलाइन उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या किमती पाहा

  • इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करताना त्यावरील वॉरंटी किंवा गॅरंटी तपासा

  • पर्यावरणपूरक वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य द्या

  • खोट्या सवलतींच्या जाळ्यात फसू नका

ग्राहक देतात याला महत्त्व

  • ऑनलाइन खरेदी करताना घरपोच करण्याचा कालावधी कमी असावा

  • घरपोच सेवेसाठी जादा शुल्क नसावे

  • वस्तूंच्या खरेदीनंतर ती पसंत नसल्यास त्यास परत करण्याची सुविधा

  • सवलती कशा व कोणत्या वस्तूंवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com