

“Allies Are Partners, Not Rivals: Fadnavis Calls for Unity Ahead of Elections”
Sakal
छत्रपती संभाजीनगर: ‘‘स्थानिक पातळीवर विशेषतः महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी युती न झाल्यास आपल्यासोबत लढणारे पक्ष मित्र आहेत, ते शत्रू नाहीत हे लक्षात ठेवा,’’ असा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिला. ‘स्थानिक स्वराज्य संस्थेत जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे,’ असे सांगून त्यांनी राज्यात महायुती म्हणून एकत्र लढण्याचे संकेत दिले.