Aurangabad : डॉ. बबन जोगदंड यांच्या पदव्यांची इंडिया बुकमध्ये नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. बबन जोगदंड यांच्या पदव्यांची इंडिया बुकमध्ये नोंद
डॉ. बबन जोगदंड यांच्या पदव्यांची इंडिया बुकमध्ये नोंद

डॉ. बबन जोगदंड यांच्या पदव्यांची इंडिया बुकमध्ये नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : यशदा, पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी आतापर्यंत मिळवलेल्या सर्वाधिक २५ पदव्या, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेऊन त्यांची प्रशंसा केली आहे.राज्यात सध्या कार्यरत अधिकारी वर्गात कदाचित सर्वाधिक पदव्या घेतल्याची नोंद त्यांच्याच नावावर होऊ शकेल, एवढ्या त्यांच्या पदव्या आहेत. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या धर्तीवर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विक्रम करणाऱ्यांची नोंद भारतामध्ये इंडिया बुक रेकॉर्डमध्ये घेतली जाते.

हे बुक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या सर्व मार्गदर्शक प्रणालीचा अवलंब करते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विविध क्षेत्रात विक्रम करणाऱ्या अनेकांची आतापर्यंत नोंद झाली आहे. त्यात डॉ. जोगदंड यांच्या शिक्षणाचीनोंद झाली आहे. डॉ. जोगदंड यांनी अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन शिक्षण घेतले. पुढे पंधरा विषयांमध्ये पदव्या व दहा विषयांमध्ये डिप्लोमा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. असे एकूण २५ अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांची या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. नुकतेच याबाबत त्यांना प्रशंसा पत्र सुद्धा पाठवण्यात आले असून यामध्ये त्यांनी घेतलेल्या विविध पदव्यांचा अंतर्भाव केला आहे. डॉ. जोगदंड यांनी तब्बल सहा विषयांत एम. ए. केले असून एमबीए, एलएलबी या महत्त्वपूर्ण पदव्यासह पत्रकारितेत पीएचडी केली आहे.

आता दुसरी डॉक्टरेट ते लोकप्रशासन या विषयात करत आहेत. इतर अन्य अशा एकूण २५ डिग्री, डिप्लोमा, प्रमाणपत्र त्यांनी मिळविली आहेत. डॉ.जोगदंड यांनी नांदेड जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम अशा खेडेगावातून येऊन विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रम मंडळांवर सदस्य आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक संस्थांचे २० हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत.

loading image
go to top