esakal | विद्यापीठ, महाविद्यालयातील तासिका ‘ऑनलाइन’ तर परीक्षा होणार ‘ऑफलाइन’

बोलून बातमी शोधा

bamu

‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेनुसार संबंधित अध्यापकांची ऑनलाइनद्वारे उपस्थिती ग्राह्य धरण्यात येणार आहे

विद्यापीठ, महाविद्यालयातील तासिका ‘ऑनलाइन’ तर परीक्षा होणार ‘ऑफलाइन’
sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात येत्या ३० एप्रिलपर्यंत ‘ऑनलाइन’ तासिका होणार आहेत. मात्र, परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेण्यात येत आहेत. 

कोरोनामुळे राज्यात जमावबंदी, संचारबंदी असल्याने विद्यापीठ परिसर आणि उपपरिसर तसेच संलग्नित महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गावर जाता येणार नाही. शैक्षणिक कामकाज ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फक्त ऑनलाइन वर्ग भरवण्यात येणार आहेत. 

Corona Updates: कोरोनाबळींची संख्या वाढतीच; मराठवाड्यामध्ये आणखी ९१ जणांच्या...

‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेनुसार संबंधित अध्यापकांची ऑनलाइनद्वारे उपस्थिती ग्राह्य धरण्यात येणार आहे. प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी विभागप्रमुखांनी निर्देशित केल्यानुसार एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. आवश्यक सेवा पुरविणारे कर्मचारी तसेच विभागप्रमुखांना आवश्यकता असेल, अशा प्रकरणी १०० टक्के उपस्थित राहणे गरजेची आहे. 

कोरोना असला तरी विद्यापीठाने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार घोषित केलेल्या प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियमितपणे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा अवलंब करावा. शक्य नसेल अशा ठिकाणी ऑफलाइन परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यास हरकत नाही. असे आवाहन करण्यात आले आहे. 

धक्कादायक प्रकार! मिनी घाटीतून ९० वर्षीय  कोरोनाबाधित रुग्ण पळाला

परीक्षेच्या ठिकाणी काम करणाऱ्या अध्यापक, कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेणे तसेच आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. असे आय.आर.मंझा यांनी कळविले आहे. 

प्रवेशासाठी ‘आरटीपीसीआर’ बंधनकारक 
विद्यापीठातील मुख्य इमारतीसह सर्वच विभागात भेट देण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ‘कोव्हिड - १९’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करावे; तसेच अभ्यागतांनी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट न देता ई व्हिजिटर सिस्टीमद्वारे कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधावा. ‘आरटीपीसीआर’च्या निगेटिव्ह अहवालाशिवाय नंतरच्या ४८ तासांतही अभ्यागतांना प्रत्यक्ष भेटता येणार नाही.