
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलाजी (एनआयव्ही) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. डेंगी, चिकनगुण्या आदी आजारांवर वनस्पतीजन्य औषधी विकसित करण्यासंदर्भात दोन्ही संस्थांच्या वतीने एकत्रित संशोधन करण्यात येणार आहे.