
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय होणार आहे. गणेशोत्सवानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात हा महोत्सव होईल. यजमानपदासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक महाविद्यालय निवडण्यात आले आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.