
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाअंतर्गत राज्य शासनाने १२० नव्या शैक्षणिक पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी चार विभागीय केंद्रे तसेच पाच उपकेंद्रांत मागणी असलेल्या ६८ जागांपैकी १८, तसेच यापूर्वीच रिक्त ३८ पदे मंजूर झाली आहेत. एकूण १७६ पदे भरल्यानंतर विद्यापीठाचे कामकाज गतिमान होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी व्यक्त केला.