Chhatrapati Sambhajinagar : सगळीकडे दुष्काळ, मग सुकाळ कसा?

शासनाच्या यादीत मराठवाड्यातील चौदाच तालुके ‘गंभीर’ स्थितीचे
drought 14 talukas of Marathwada are in critical status in government list chhatrapati sambhajinagar
drought 14 talukas of Marathwada are in critical status in government list chhatrapati sambhajinagarSakal

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या खरिपात निसर्गाने दगा दिल्याने नांदेड व हिंगोली जिल्हे वगळता मराठवाड्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तथापि, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही विशेषत: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यामुळे निसर्गाने झोडपले अन् आता मायबाप सरकारनेही दुर्लक्ष केले अशा परिस्थितीत शेतकरी हातबल झाले आहेत.

मराठवाड्याच्या आठ तालुक्यातील ७६ पैकी ६० तालुक्यांमध्ये यंदाच्या हंगामात सरासरीच्या प्रमाणात अपेक्षित पाऊस झाला नाही. संपूर्ण विभागात ८०.५२ टक्के पाऊस झाला आहे. ७३२.४० मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते त्या तुलनेत ५८९.७० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यात नांदेड जिल्ह्यात १०१.७७ टक्के, हिंगोलीत ८८.५६ तर छत्रपती संभाजीनगरात ८४.५९ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय जालना ७५.३०, बीड ७३.५७, लातूर ७०.१८, धाराशिव ६८.०८ तर परभणी जिल्ह्यात ६३.९३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

पन्नास लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर पेरणी

मराठवाड्याच्या ८ हजार ५०१ गावांच्या शिवारात लागवडी योग्य ५६ लाख १५ हजार १० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी यंदाच्या खरिपातील ५० लाख ९७ हजार ६०६ हेक्टरमध्ये पेरणी क्षेत्र आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७३४९०६ पेरणी झालेले क्षेत्र आहे. धाराशिव ५७४४३५, बीड ८०९१०४, परभणीमध्ये ५१९३१४, नांदेड ७९८५६८ , जालना ६४९०९२, लातूर ६२९५७५ तर हिंगोली जिल्ह्यात ३८२६०९ हेक्टरमध्ये खरिप पेरण्या झाल्या आहेत. मात्र यंदा पुरेशा प्रमाणात अपेक्षित पाऊस झाला नाही.

दुष्काळी परिस्थिती असल्याचे पर्जन्यमान आणि पैसेवारीच्या आधारे ठरवून सरकार विविध सवलती जाहीर करते. पैसेवारीवरूनच सरकारने पहिल्या टप्यात विभागातील १४ जिल्ह्यातील तालूक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे. दुसऱ्या टप्यात इतरही तालूक्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात ५० टक्क्यांहून कमी पैसेवारी आल्यामुळे मराठवाडा विभागात दुष्काळी परिस्थिती असल्याला शिक्कामोर्तब झाले आहे. आता सरकार कोणकोणत्या योजना आणि सवलती जाहीर करते, याकडे डोळे लागले आहेत.

अंतीम पैसेवारी १५ डिसेंबरला होईल

१५ सप्टेंबर रोजी नजर आणेवारी नोंदविण्यात आली होती. आता ३१ ऑक्टोबर रोजी सुधारित आणेवारी जाहीर झाली आहे. आता १५ डिसेंबर रोजी अंतीम पैसेवारी जाहीर होणार आहे. ही अंतीम पैसेवारी असल्याने यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहे. त्यानंतर दुष्काळी तालूक्यांची संख्या वाढणे अवलंबून आहे.

सर्वात कमी पैसेवारी छत्रपती संभाजीनगरात

जिल्हा- पैसेवारी

  • संभाजीनगर -४५.५९

  • धाराशिव -४७.७३

  • बीड -४६.९१

  • परभणी- ४७.६८

  • नांदेड -४७.८७

  • जालना -४७.३५

  • लातूर -४७

  • हिंगोली- ४९.२०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com