
चेलीपुरा : भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती निवळली. पण, या काळात पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीतील वस्तूंवर कॅट या व्यापारी संघटनेने बहिष्कार टाकला. त्याचा परिणाम शहरातील ड्रायफ्रूट आणि मसाला बाजारावर झाला. किलोमागे तब्बल १०० ते ४०० रुपयांची भाववाढ झाली. याचा फटका ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही बसत आहे.