देवगिरी अभियांत्रिकीच्या ‘डायनॅमिक बूस्टर्स ८.०’ संघाची राष्ट्रीय विजेतेपदावर मोहोर

देवगिरी अभियांत्रिकीच्या ‘डायनॅमिक बूस्टर्स ८.०’ संघाची राष्ट्रीय विजेतेपदावर मोहोर
Published on: 
‘डायनॅमिक बूस्टर्स ८.०’ संघाची राष्ट्रीय विजेतेपदावर मोहोर फॉर्म्युला कार्ट डिझाइन चॅलेंजमध्ये सात पुरस्कार; मार्गदर्शक डॉ. गोपेकर यांना ॲपेक्स मेंटॉर अवॉर्ड छत्रपती संभाजीनगर, ता. ८ ः देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीजच्या ‘टीम डायनॅमिक बूस्टर्स ८.०’ संघाने राष्ट्रीय स्तरावरील एफएमएई फॉर्म्युला कार्ट डिझाइन चॅलेंज सीझन १० स्पर्धेत ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावत संस्थेचा गौरव वाढविला. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान कोईम्बतूर येथील करी मोटर स्पीडवेवर ही स्पर्धा झाली. कन्व्हेन्शनल व्हेइकल श्रेणीत देशातील ३३ संघ सहभागी झाले होते. यश भंडारी यांच्या नेतृत्वाखालील २९ विद्यार्थ्यांच्या संघात नऊ विद्यार्थिनींचा समावेश होता. कॉस्ट इव्हॅल्युएशन आणि स्किड पॅडमध्ये प्रथम, तर लॅटरल ॲक्सिलरेशन, डिझाइन इव्हॅल्युएशन, ऑटोकॉर्स आणि सेल्स इव्हेंटमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. अशा सात पुरस्कारांवर संघाने नाव कोरले. संघाचे फॅकल्टी ॲडव्हायझर डॉ. डी.यू. गोपेकर यांना मार्गदर्शनाबद्दल एफएमएई ॲपेक्स मेंटॉर अवॉर्ड २०२६ देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे संचालक डॉ. सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ. सचिन बोरसे, डॉ. आरती वाढेकर, डॉ. राजेश औटी यांनी अभिनंदन केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळुंके, सचिव सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेखसलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारिणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण तसेच सर्व प्राध्यापकांनी संघाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.