

छत्रपती संभाजीनगर : ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या घोटाळा प्रकरणातील तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सोलापूर आणि बीड येथून संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, ता. १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.