Aurangabad : औरंगाबादेत ईडीचे छापे, उद्योजकांचे धाबे दणाणले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED
औरंगाबादेत ईडीचे सात ठिकाणी छापे, उद्योजकांचे धाबे दणाणले

Aurangabad : औरंगाबादेत ईडीचे छापे, उद्योजकांचे धाबे दणाणले

औरंगाबाद : शहरातील दोन उद्योजकांच्या कार्यालयावर ईडीने गुरुवारी (ता.११) सकाळी छापे मारले. दोघा उद्योजकांपैकी एक विकासक (बिल्डर) असून दुसरा उद्योजक हा बियाणे क्षेत्रातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यासाठी ईडीची मुंबईतील दोन पथके तैनात असून त्यांनी शहरातील (Ed Raids In Aurangabad) दोन्ही उद्योजकांच्या कार्यालयावर चौकशी करण्यास सुरवात केली आहे. या प्रकरणी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथून एक पथक औरंगाबादेत आले होते. विशेष म्हणजे एक दिवस आधीच म्हणजेच बुधवारी (ता.दहा) येऊन ज्या ठिकाणी छापे टाकावयाचे आहे, त्या ठिकाणची पाहणी या पथकाने केल्याचेही सुत्रांनी सांगितले. बिल्डरसह बियाणे क्षेत्रातील उद्योजक अशा दोघांच्या कार्यालयांवर सात ठिकाणी गुरुवारी हे छापे टाकण्यात आले आहेत. (Aurangabad)

हेही वाचा: Ola Scooterची टेस्ट राईड सुरु, फक्त 'या' शहरांमध्ये उपलब्ध

ईडीच्या पथकाच्या हाती काय लागले हे मात्र आणखी समोर आलेले नाही. मनी लॉन्ड्रींग आणि आपदा संपत्तीच्या आधारे खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतरच हे छापेमारीचे सत्र सुरु झाल्याचे सुत्रांनी सांगितले. ईडीच्या या कारवाईमध्ये शहरातील इतर बड्या उद्योजकांचाही हात असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली असून छाप्यांमुळे शहरातील इतर बड्या उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.

loading image
go to top