Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर आणि कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या मराठवाड्यातील तब्बल २२ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या.
officer transfer
officer transferesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - शालेय शिक्षण विभागाने अखेर एक धाडसी निर्णय घेत, गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर आणि कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या मराठवाड्यातील तब्बल २२ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे आदेश काढत शिक्षण विभागाने अनेक अधिकाऱ्यांची वर्षानुवर्षांची मक्तेदारी थेट मोडीत काढली आहे. शिक्षण विभागाच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com