
औरंगपुरा : राज्य शालेय शिक्षण विभागाच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याच्या प्रस्तावावर आधारित विशेष ‘शिक्षण कट्टा’ संवाद सत्र सोमवारी (ता.३०) गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात पार पडले. शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण केंद्र विभागीय कार्यालय आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्रात नामवंत शैक्षणिक, मानसशास्त्रीय व प्रशासकीय तज्ज्ञांनी सहभाग घेत आपापली अभ्यासपूर्ण मते मांडली.