Maharashtra Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे शुल्क पुन्हा वाढवले आहे. दहावीचे शुल्क ₹४७० वरून ₹५२०, तर बारावीचे ₹४९० वरून ₹५४० झाले असून पालकांच्या खिशावर अधिक ताण येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : सामान्य कुटुंबातील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेची तयारी करत असतानाच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा एकदा त्यांच्यावर शुल्कवाढीचा घाव घातला आहे.