
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता आणि नियुक्ती आदेशांच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शिक्षण विभागाने ३० ऑगस्टपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, २०१२ पूर्वीच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती देखील पोर्टलवर भरण्याच्या सूचनेमुळे जिल्ह्यातील ८ हजार शिक्षकांमध्ये गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण आहे.