Latur Educationist Death

Latur Educationist Death

sakal

Dr. Janardan Waghmare : लातूर पॅटर्नचे शिल्पकार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपले

Latur Educationist Death : विद्वत्ता आणि नम्रतेचा संगम असलेले ज्येष्ठ साहित्यिक, लातूर पॅटर्नचे शिल्पकार आणि माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले; शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ कायमचा मालवला आहे.
Published on

माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

लातूर : विद्वत्ता, नम्रता, तत्वनिष्ठता याचा संगम असलेले, साहित्य, शिक्षण, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले ख्यातनाम साहित्यिक-विचारवंत, माजी कुलगुरू, माजी खासदार प्रा.डॉ. जनार्दन वाघमारे (वय ९२) यांचे सोमवारी (ता. दोन) सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. तीन) कौठा (ता. औसा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निधनाची वार्ता समजताच त्यांच्या ‘आविष्कार’ या निवासस्थानी विविध क्षेत्रांतील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या जाण्याने ‘समाजचिंतक हरपला’ अशा शब्दांत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

गेल्या काही महिन्यांत सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा या घनिष्ट मित्रांच्या अचानक जाण्याने डॉ. वाघमारे हे खचले होते. त्यातच मागील महिन्यात ते घरात पाय घसरून पडले. त्यांच्या डोक्याला मार बसला. त्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयातून नुकतेच त्यांना घरी जाऊ देण्यात आले होते. मात्र, आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

Latur Educationist Death
Vasantrao Naik: वसंतराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेची वास्तू जीर्ण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com