
मानोरा : ज्या व्यक्तीने राज्यात हरीतक्रांती घडविली, राज्याची धुरा सलग ११ वर्ष सांभाळली असे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे प्राथमिक शिक्षण विठोली (ता. मानोरा) या शाळेत झाले. त्या शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. या वास्तूची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला मात्र कामाला अजून सुरवात झालेली नाही.