

Exam Centers
sakal
छत्रपती संभाजीनगर : दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी केंद्रावर सीसीटीव्ही, पाणी, स्वच्छतागृह, संरक्षण भिंत आणि जाळीदार खिडक्या या सुविधा नसतील, तर अशा केंद्रांची मान्यता रद्द केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आणि परीक्षेतील शिस्तबद्धतेला प्राधान्य देत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला.