esakal | रोज खाओ अंडे, पण मिळणार कुठे? औरंगाबाद शहरात अंड्यांचा तुटवडा
sakal

बोलून बातमी शोधा

eggs

औरंगाबाद शहरात अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे.

रोज खाओ अंडे, पण मिळणार कुठे? औरंगाबाद शहरात अंड्यांचा तुटवडा

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद  : आधी कोरोना होतो म्हणून आधी नाकारले आणि नंतर अंड्यांचे महत्त्व डॉक्टरांकडून समजल्याने अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अंडी देणाऱ्या कोंबड्याच कमी झाल्याने मागणीच्या प्रमाणात अंड्यांची उपलब्धता नसल्याने शहरात अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे.

‘समांतर’ची फाईल बंद, एकोणतीस कोटीत लवादमधूनही कंपनीने घेतली माघार


कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोरोना होईल या अफवेमुळे लोकांनी चिकन खाणे बंद केले. यामुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला. हजारो कोंबड्या मारून टाकण्यात आल्या तर काहींनी फुकटात वाटल्या. नंतर चिकन खाल्याने कोरोना होत नाही याचे खुलासे झाल्यानंतर ज्यांनी कोंबड्या मारून टाकल्या, फुकटात वाटल्या त्यांना हळहळ करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

आता कोरोना होऊन बरे झालेले आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता थंडीचे दिवस सुरू होणार असल्याने या दिवसातही अंड्यांची मागणी वाढत असते. सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढावी, कोरोना होऊन बरे झालेले विकनेस लवकर कमी व्हावा पूर्वीसारखे ठणठणीत व्हावे म्हणून काहींनी नव्यानेच अंडी खाणे सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, कुलगुरु येवले यांचे आवाहन

यामुळे सध्या कोंबडीच्या अंड्यांना मागणी वाढली आहे. मात्र त्या प्रमाणात उपलब्धता नसल्याने टंचाई जाणवत आहे. किंमतीही वाढल्या आहेत. पोल्ट्रीच्या अंड्यांची ही स्थिती, गावरान अंड्यांची तर हातोहात विक्री होत आहे. येथील अंड्यांचे पुरवठादार अभिषेक एग्जचे दामोदर डिघुळे यांनी सांगितले, औरंगाबादमध्ये सर्वात जास्त हैद्राबाद येथून अंड्यांचा पुरवठा होतो. तर वीस पंचवीस टक्के पुरवठा औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांतून होतो.दररोज शहरात ७ ते ८ लाख अंडी लागतात मात्र सध्या निम्माच म्हणजे ३ ते ४ लाख अंड्यांची उपलब्धता आहे. मागणी तर खूप वाढली आहे मात्र त्या तुलनेत उपलब्धता नाही. कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसायाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top