Monsoon : वीज पडून दहा दिवसांत आठ जणांचा मृत्यू;पावसाने घेतला दीडशेवर पशुधनाचा बळी

मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनच्या पावसाने मराठवाड्यात जोरदार सलामी दिली आहे. या सलामीबरोबरच जीवित व वित्तहानीही बरीच झालेली आहे.
Monsoon
Monsoon sakal

छत्रपती संभाजीनगर : मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनच्या पावसाने मराठवाड्यात जोरदार सलामी दिली आहे. या सलामीबरोबरच जीवित व वित्तहानीही बरीच झालेली आहे. आठ जणांचा वीज पडून मृत्यू झाला, तर एक महिला पुरात वाहून गेली; तसेच गोठा पडल्याने एका व्यक्तीचा अशा दहा जणांचे गेल्या दहा दिवसांत मृत्यू झाले. शिवाय लहान-मोठे मिळून दीडशेवर पशुधन दगावले आहे.

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यात वागदरी येथील भाऊराव वाकसे (वय ७०), होनी हिप्परगा येथील बळिराम मुसळे, निलंगा तालुक्यात कासार बालकुंदा येथे शंकर सारगे (वय ४२), जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील देवादिहदगाव येथील संदीप राठोड (वय २५), धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याच्या पारडी येथील शीतल चौधरी, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील सावरगाव (पो.) येथील विठ्ठल बांगर (वय १३), नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील पांगरी येथील शिवनंदा जामगे (वय ५५) आणि कंधार तालुक्यातील येलूर येथील शंकर धरमकर (वय ३०) यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्याच्या देवणी येथील सविता फडके या महिलेचा पुरात वाहून गेल्याने, तर नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील रुईधा येथील भगवान कदम (वय ७०) यांचा वादळी वाऱ्याने गोठा पडल्याने मृत्यू झाला. याशिवाय एक जूनपासून वादळी पाऊस, गारपिटीत ९ जण जखमी झाले आहेत. यामध्ये जालना जिल्ह्यातील ६, लातूर २, तर धाराशिव जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.

दुभती १२१ जनावरे दगावली

अवकाळी पावसात मराठवाडा विभागात १५२ पशुधन दगावले आहे. यामध्ये १२१ दुभत्या जनावरांचा समावेश आहे. सर्वाधिक लातूर जिल्ह्यात १९, तर बीड जिल्ह्यात १५ मोठी तर क्रमशः ५९ व ९ लहान दुभती जनावरे दगावली आहेत. या दोन जिल्ह्यांत ओढकाम करणारी व दुभते लहान-मोठे मिळून लातूरमध्ये ८९, तर बीडमध्ये २८ पशुधन दगावले; तसेच दुभते व ओढकाम करणारी मिळून छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात प्रत्येकी ६, नांदेड १४, परभणी ४, धाराशिव ३ आणि हिंगोली जिल्ह्यात २ पशुधन दगावल्याचे सोमवारी (ता. दहा) प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

शंभरावर घरांची पडझड

अवकाळी पावसात चार जिल्ह्यांतील १०८ घरांची पडझड झाली. लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले. लातूर जिल्ह्यात एक कच्चे घर पूर्ण पडले आहे, तर १०१ कच्च्या घरांची थोड्याफार प्रमाणात पडझड झाली आहे; तसेच छत्रपती संभाजीनगरात ५, परभणी व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका घर अंशतः पडल्याचे अहवालात म्हटले आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल तयार करण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापनातून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com