भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा,एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना आवाहन | Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा,एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना आवाहन
भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा,एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना आवाहन

भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा,एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना आवाहन

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : जिल्ह्यात शिवसेनेचा कार्यकर्ता वर्ग सक्षम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परभणी जिल्हा हा शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला आहे. त्यामुळे यंदा स्थानिक स्वराज्य संस्थावर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात सोमवारी (ता.१५) शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav), आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार विप्लव बाजोरिया, जिल्हा प्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणेराव, सखुबाई लटपटे आदींची उपस्थिती होती. मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना पक्ष (Parbhani) हा शिवसैनिकामुळेच मोठा झालेला आहे.

हेही वाचा: Mannu Bhandari : प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी यांचे निधन

कार्यकर्ता हाच शिवसेनेचा प्राण आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आजपर्यंत पक्ष वाटचाल करत आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आहे. त्यासाठी सर्वांनी सज्जा व्हावे. परभणीतील विकासाला कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही. परभणी येथील नाट्यगृहाचे कामही पूर्णत्वास घेऊन जावे. त्यासाठी ही निधी दिला जाईल, असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले. खासदार संजय जाधव म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. अशा वेळी अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे प्रगतीचे द्योतक आहे. जिल्हा परिषदेवर भगवा फडकविला जाईल तर परभणी महापालिकेत शिवसेना किंगमेकरची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

loading image
go to top