

The European migratory ‘Bhordi’ bird spotted resting in the Balaghat grasslands of Ahmedpur.
Sakal
हडोळती: निसर्गाच्या चक्रानुसार दरवर्षी हिवाळा सुरू होताच दूरवरच्या देशांतून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. यंदाही युरोप व मध्य आशियातून आलेल्या ‘भोरडी’ (रोसी स्टारलिंग) या विदेशी पक्ष्याने बालाघाटच्या माळरानात हजेरी लावली असून, अहमदपूर तालुक्यात त्याचे दर्शन झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.