
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना मंगळवारी दोषी ठरविले. या प्रकरणात त्यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ‘कडू आमदार होते म्हणजे त्यांना मारहाण करण्याचा परवाना मिळाला असे नाही,’ अशी टिपणी न्यायालयाने केली.