esakal | कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षा विभागाचे काम ठप्प,‘लेखणी बंद’चा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

विविध मागण्यांसाठी विद्यापीठे व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिकच तीव्र केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षा विभागाचे काम ठप्प,‘लेखणी बंद’चा परिणाम

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद  : विविध मागण्यांसाठी विद्यापीठे व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिकच तीव्र केले आहे. परीक्षा विभागाचे कामकाज संपूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास एक ऑक्टोबरपासून ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिला आहे.


सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून राज्यातील २४ विद्यापीठांचे कर्मचारी, अधिकारी अजूनही वंचित आहेत. यासंदर्भात राज्य शासन, मंत्री यांच्यासोबत वारंवार बैठका पार पडल्या. मात्र, कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती व अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे समिती स्थापना केली आहे. गेल्या आठवड्यात ऑनलाइन बैठक होऊन २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.

औरंगाबादेत आज ३३९ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात २५ हजार ७२६ रुग्ण झाले बरे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुमारे ४५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. पर्वत कासुरे, डॉ. दिगंबर नेटके यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश आकडे, जीवन डोंगरे, अनिल खामगावकर, डॉ. सुनीता अंकुश यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. उल्हास उढाण, प्रा. हरिदास सोमवंशी यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top