पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी औरंगाबादेत परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी औरंगाबादेत परीक्षा

पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी औरंगाबादेत परीक्षा

औरंगाबाद : पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलासाठी औरंगाबाद शहरात शुक्रवारी (ता. १९) शेकडो लेखी परीक्षा दिली. अनेक उमेदवारांच्या प्रवेश पत्रावर परिक्षा केंद्र एकीकडचे आणि पत्ता दुसरीकडचा देण्यात आल्याने परिक्षा केंद्रावर पोहोचतांना उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली.

पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलासाठी सध्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे गृहविभागाने दिलेल्या निर्देशानुसार उमेदवारांना पिंपरी-चिंचवड येथे न बोलावता त्यांच्या जिल्ह्यातच परिक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यातील ८० केंद्रावर ही परिक्षा घेण्यात आली.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

तब्बल २१ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यावेळी हजारो उमेदवारांनी शहराच्या विविध भागातील परिक्षा केंद्रावर जाऊन लेखी परिखा दिली. दरम्यान, परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेश पत्रावर केंद्राचा पत्ता चूकल्याने अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

loading image
go to top