esakal | वाळूज औद्योगिक परिसरात वीज उपकेंद्रात स्फोट, लाखोंचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

वाळूज (जि.औरंगाबाद) : वीज उपकेंद्रमध्ये स्फोट झाल्याने आकाशात उडालेले धुराचे लोट.

वाळूज औद्योगिक परिसरात वीज उपकेंद्रात स्फोट, लाखोंचे नुकसान

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज औद्योगिक परिसरातील Waluj MIDC महापारेषणच्या Mahapareshan १३२ केव्ही उपकेंद्रमध्ये बिघाड होऊन सोमवारी (ता.पाच) सांयकाळी सात वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यामुळे Aurangabad सिडको वाळूज महानगर, बजाजनगर, पंढरपूर, वाळूज तसेच वाळूज औद्योगिक वसाहतीतील काही परिसरात वीजपुरवठा Power Supply खंडीत झाला होता. सुमारे तासभर वीजपुरवठा खंडित राहिल्याने अनेक कंपन्यातील उत्पादन बंद पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या महापारेषणच्या १३२ केव्ही उपकेंद्रमधील विद्युत ट्रॉन्सफार्मरमध्ये सोमवारी सायंकाळी अचानक स्फोट होऊन वीजपुरवठा खंडीत झाला. यावेळी ट्रॉन्सफार्मरमधील ऑइलने पेट घेतल्याने वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.explosion in power station in waluj midc area aurangabad news

हेही वाचा: पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

मात्र तोपर्यंत आग आटोक्यात आली होती. यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरातील बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, वाळूजसह औद्योगिक परिसरातील अनेक कारखान्यातील वीजपुरवठा खंडीत झाला. कारखान्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या या फिडरवरील नादुरुस्त ट्रान्सफर महापारेषचे सहायक अभियंता व कर्मचाऱ्यांनी दूरुस्त करून विज पुरवठा पूर्ववत केला. मात्र सुमारे तासभर वीजपुरवठा खंडित राहिल्याने अनेक कंपन्यातील उत्पादन बंद पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

loading image
go to top