
छत्रपती संभाजीनगर : मजहर खान याच्या कोहिनूर शिक्षण संस्थेतील सचिव आणि सहसचिवांचा आणखी एक कारनामा समोर आला. संस्थेच्या सचिव आणि सहसचिव या दोघांनी चक्क एमफिलची बोगस डिग्री सादर करीत प्रवेश प्रक्रियेत सूट मिळविली आणि विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळवल्याचे उघड झाले.