
छावणी : किराणा दुकानदाराला स्वस्तात दोन किलो सोने देण्याचे आमिष दाखवत दोन भामट्यांनी १४ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार ८ ते १७ मेदरम्यान छावणी तोफखाना येथे घडला. आरोपींनी केवळ सोन्याचा एक खरा मणी देत विश्वास पटवला. नंतर फसवणूक केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.