Police Investigate Ashraf’s Passport in Fake IAS Kalpana Case: बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणात पोलिसांनी प्रियकर अशरफच्या पासपोर्टची सखोल तपासणी सुरू केली असून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी होत आहे. या प्रकरणातील फसवणुकीचे धागेदोरे नव्या पुराव्यांमुळे अधिकच गुंतागुंतीचे बनले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणात आता पोलिस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले यांनीही लक्ष घातले आहे. आजवरच्या सर्व प्रकरणांचा आढावा त्यांनी घेतला. त्यांच्यासह गुन्हे शाखेनेदेखील माहिती जाणून घेतली.