
छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या औषधी भांडाराला बनावट औषधपुरवठा केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात एकूण चौघांवर गुन्हा नोंद झाला. अन्न व औषध प्रशासनाने बनावट औषधांचा काळाबाजार करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली आहे.