Ghati Hospital : घाटीतील ‘त्या’ औषधींचे; अहवालासाठी करावी लागणार ६० दिवसांची प्रतीक्षा
Fake Medicines : घाटी रुग्णालयाला पुरवठा केलेल्या औषधींचे ४ नमुने मुंबई प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवालासाठी ६० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : बनावट औषधांचा विषय राज्यभर गाजत असून, घाटी रुग्णालयाला कोल्हापूर येथील विशाल एंटरप्राइजेसने पुरवठा केलेल्या औषधींचे ४ नमुने आता मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.