
फुलंब्री : फुलंब्री शहरातील गट नंबर १७/१ मध्ये बनावट एनए करून सुमारे दीडशे प्लॉटधारकांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी बिल्डर आणि डेव्हलपर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन अव्वल कारकून, आताचे नायब तहसीलदार संभाजी थोटे यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली.