
Farmer Death
Sakal
परभणी : धारणगाव (ता. परभणी) येथील तरुण शेतकरी गजानन आश्रुबा डुकरे याचा ई-पीक पाहणीसाठी शेतात जाताना दुधना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. आठ) पहाटे उघडकीस आली. संतप्त नातेवाइकांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून तीव्र निषेध व्यक्त केला.