
पिशोर : अंजना नदीवरील पुलाच्या बांधकामास विरोध करत शफेपूर येथील शेतकरी कृष्णा विठ्ठल मोकासे (वय ७०) यांनी २२ जुलैला विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटीमध्ये उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २९) मृत्यू झाला. यानंतर कृष्णा यांच्या नातेवाइकांनी बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह पिशोर पोलिस ठण्यासमोर ठेवून दोषींवर कारवाईची मागणी केली.