esakal | कृषी कायद्यांच्या विरोधात लातुरात शेतकऱ्यांचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

लातूर : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

भाजप व मोदी सरकार शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द न करता देशातील लोकशाही व्यवस्था मोडकळीला आणत आहे.

कृषी कायद्यांच्या विरोधात लातुरात आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या (Anti Farmer Laws) विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून येथे शेतकऱ्यांच्या वतीने हाताला काळ्या फिती लावून तसेच काळे झेंडे दाखवत बुधवारी (ता.२६) आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कृषी कायदे (Farm Bills) मंजूर केले आहेत. त्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी या तीन कायद्यांच्या विरोधात ठाण मांडून बसले आहेत. अशी परिस्थिती असताना देखील भाजप (BJP) व मोदी सरकार (Narendra Modi Government) शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द न करता देशातील लोकशाही व्यवस्था मोडकळीला आणत आहे. (Farmers Agitation Against Anti Farm Bills In Latur)

हेही वाचा: तरुण डाॅक्टरची झुंज अयशस्वी, आर्थिक मदत लवकर मिळाली असती तर..

देश अदानी, अंबानींच्या दावणीला बांधला जात आहे. म्हणून मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात आज किसान संघर्ष समन्वय समितीच्या (Kisan Sangharsh Coordinate Committee) वतीने काळ्या फिती हाताला बांधून व काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. या आंदोलनात उदय गवारे, दत्ता सोमवंशी, सुशील सोमवंशी, भालचंद्र कवठेकर, धर्मराज पाटील, राजकुमार होळीकर, शाबुद्दीन शेख, सुनील मंदाडे, नामदेव बामणे, उल्हास गवारे, पवनराज पाटील आदी सहभागी झाले होते.