

देवगाव रंगारी : कन्नड तालुक्यातील केसापूर येथील स्नेहल चंद्रकांत हार्दे या शेतकऱ्याच्या लेकीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यातून चौथा क्रमांक मिळविला. दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा मान मिळवला. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.