मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कृषिपंपाचे भरले ७ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कृषिपंपाचे भरले ७ कोटी

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कृषिपंपाचे भरले ७ कोटी

औरंगाबाद : कृषीपंपांची वीज बिले भरण्यासाठी चालू दोन वीज बिले भरल्यास नादुरूस्त अथवा जळालेले रोहित्र बदलून देण्याचा महावितरणने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळात नोव्हेंबरमध्ये १५ दिवसात १४ हजार शेतकऱ्यांकडून ७ कोटी ५१ लाख रूपयांचा भरणा करण्यात आला आहे. दोन चालू कृषीपंप वीज भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

कृषीपंप रोहित्र नादुरूस्त अथवा जळाल्यास ते दुरुस्त करण्यासाठी ऑइल व इतर सामग्रीसाठी लागणारा खर्च महावितरणला करावे लागते. तसेच रोहित्र जागेवरून दुरुस्तीसाठी आणणे परत शेतात बसवणे यासाठी मोठा खर्च होतो. या शिवाय कृषीपंपासाठी वापरलेल्या विजेचे पैसे वीज कंपन्यांना व वीज वहनाचा महापारेषण कंपनीला दरमहा द्यावेच लागतात.

सन २०२१- २०२२ मधील कृषीपंपाची ५ बिले होतात. कृषी धोरणानुसार रोहित्रावरील दोन चालू वीज बिले ८० टक्के कृषी ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केल्यास रोहित्र दुरुस्त करून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. रोहित्र नादुरूस्त अथवा जळाल्यास चालू दोन चालू कृषीपंपांची वीज बिले भरून सहकार्य करावे तसेच ’आपले रोहित्र, आपली जबाबदारी स्वीकारावी'' असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

नोव्हेंबरच्या १५ दिवसात भरणा केलेली रक्कम

परिमंडळ कृषी ग्राहक भरणा केलेली रक्कम

औरंगाबाद ४६२० २.७२

लातूर ४९८१ २.७२

नांदेड ४३४६ २.०७

मराठवाडा १३९४७ ७.५१

loading image
go to top